
नागरिकत्व कायद्याला आसाममध्ये जोरदार विरोध झाला होता. अनेक ठिकाणी हिंसाचारही घडला होता. म्हणून सरकारने आसाममधील इंटरनेट बंद केले होते. आठवडाभराच्या अवधीनंतर सरकारने आता इंटरनेट सेवा सुरु केली आहे. शुक्रवारी सकाळी 9 वाजल्यापासून राज्यात इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोधा पाहून 11 डिसेंबर पासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. नंतर पूर्ण आसाममध्ये ही सेवा बंद करण्यात आली होती. गुरुवारीसुद्धा आसाममध्ये या कायद्याच्या विरोधासाठी नागरिकांनी आंदोलन केले. गुवाहाटी उच्च न्यायालयाने इंटरनेट सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. तरी राज्यात इंटरनेट सेवा बंद होती.
आज एअरटेलने एक जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ब्लॅकआऊट करण्याचा कुठलाच नवीन आदेश मिळाला नाही म्हणून सकाळी 9 वाजल्यापासून आम्ही इंटरनेट सेवा सुरू केली आहे.

























































