आता संघात बदल करावाच लागेल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, जयपूर

विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला आयपीएलच्या 12व्या मोसमात पराभवाचा चौकार पाहावा लागला. अद्याप विजयाचे खातेही न उघडू शकल्याने कोहली हताश झाला असून आता संघात बदल करण्याची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया त्याने दिली. मात्र आपल्याकडे अजूनही दहा लढती असल्याने नक्कीच स्पर्धेत पुनरागमन करू, असा विश्वासही कोहलीने व्यक्त केला.

राजस्थान रॉयल्सविरुद्ध 15 ते 20 धावा अजून हव्या होत्या. मात्र तरीही मार्क्स स्टोयनिस व मोईन अली यांनी बंगळुरूला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली होती. क्षेत्ररक्षणातही अनेक चुका झाला. कुठल्याच स्तरावर चांगला खेळ न झाल्याने हार पत्करावी लागली. विजयाच्या पटरीवर येण्यासाठी संघात काही बदल करण्याची वेळ आली आहे. संघ अधिक संतुलित बनवून आम्हाला स्पर्धेत पुढे जावे लागेल, असेही कोहलीने सांगितले.