… तर आयपीएल स्पर्धा एप्रिल नाही ‘या’ महिन्यात होणार, बीसीसीआय घेणार निर्णय

..

कोरोना व्हायरस संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएल स्पर्धेची सुरुवात 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने देशातील एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन ही स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता ही स्पर्धा ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. याबाबत बीसीसीआयकडून तारखांची चाचपणी सुरू आहे.

कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे आयपीएलचा 13 वा हंगाम एप्रिल-मेमध्ये होणार होता. परंतु एप्रिलमध्ये ही स्पर्धा होण्याची शक्यता कमी आहे. देशात सध्या कोरोनाच्या संक्रमनामुळे 21 दिवसांसाठी लॉकडाऊन लागू आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता आयपीएल स्पर्धा ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये घेता येऊ शकेल का, याची चाचपणी बीसीसीआयकडून सुरू झाली आहे.

हिंदुस्थानात सध्या कोरोनाचे 1300 रुग्ण आहेत आणि यात वाढ होत आहे. तसेच देशात पुढील चार महिन्यांमध्ये कोरोना विषाणूचे संक्रमण कमी झाले तरच ऑगस्ट-सप्टेंबर 2020 मध्ये यंदाची आयपीएल स्पर्धा घेता येऊ शकेल का, यासाठी चाचपणी करण्यास बीसीसीआयने सुरुवात केली आहे. ऑगस्टच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही स्पर्धा घेता येईल का, याबद्दल सध्या बीसीसीआयकडून शोध घेतला जातो आहे. ऑक्टोबरनंतर ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 वर्ल्डकप होणार आहे. त्यामुळे त्याच्याआधीच आयपीएल संपवणे आवश्यक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या