Photo story – IPL 2020च्या साखळी फेरीत ‘या’ 3 हिंदुस्थानी फलंदाजांनी पाडला धावांचा पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) स्पर्धेचा अखेरचा टप्पा बाकी आहे. आज दुसरा क्वालिफायर सामना सनरायझर्स हैद्राबाद आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये रंगणार आहे. या सामन्यातील विजयी संघाचा सामना 10 नोव्हेंबरला मुंबई इंडियन्सशी होईल.

आयपीएलचे अखेरचे दोन सामने बाकी असल्याने या स्पर्धेत झालेल्या विक्रमाची, खास खेळीची चर्चा आतापासूनच सुरू झालीय. आज आपण साखळी फेरीत धावांचा पासून पाडणाऱ्या 3 हिंदुस्थानी खेळाडूंची माहिती घेणार आहोत. यातील 2 खेळाडू टीम इंडियाचे स्टार असून एक अनकॅप खेळाडू आहे. अनेकांना त्यात युवीची झलक दिसते. जाणून घेऊया…

1. के.एल. राहुल (KL Rahul)

images-11

किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ आयपीएल 2020 मधून बाहेर फेकला गेला असला तरी कर्णधार के.एल. राहुल याने आपल्या दमदार फलंदाजीने छाप उमटवली. सलगच्या लढतीत राहुलने खोऱ्याने धावा काढल्या. साखळी फेरीतील 14 लढतीत त्याने 58.83च्या सरासरीने 670 धावा चोपल्या. यात त्याच्या एका शतकाचा आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. ऑरेंज कॅप देखील सध्या त्याच्याच माथ्यावर आहे.

2. शिखर धवन (Shikhar Dhawan)

shikhar-dhawan

दिल्ली कॅपिटल्सकडे विजेतेपद पटकावण्याची अजून एक संधी आहे. दिल्लीचा सलामीवीर खेळाडू शिखर धवन यालाही आपल्या बॅटची कमाल दाखवण्याची संधी आहे. साखळी फेरीत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूत धवनचा दुसरा नंबर आहे. खराब सुरुवात झालेल्या धवनने नंतर सलग 2 शतक ठोकत आपला फॉर्म दाखवला. 14 लढतीत त्याने 2 शतक आणि 3 अर्धशतकांच्या मदतीने 525 धावा केल्या आहेत.

3. देवदत्त पडीकल (Devdutt Padikkal)

images-10

आयपीएल 2020 मध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते डावखुऱ्या देवदत्त पडीकल याने. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या या तरुण खेळाडूने 14 लढतीत 5 अर्धशतक आणि 31 च्या दमदार सरासरीने 472 धावा केल्या. या अनकॅप खेळाडूत अनेकांना टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंह याची झलक दिसते. मात्र येणारा काळच हे ठरवेल.