हॉटेलऐवजी रिसॉर्टला पसंती, खेळाडूंच्या निवासासाठी आयपीएल संघ मालकांचा कल

627

पंचतारांकित हॉटेल्समध्ये शहरातील व्यक्तींपासून इतर पर्यटकांचे वास्तव्य असते. अशा परिस्थितीत क्रिकेटपटू व सपोर्ट स्टाफच्या आरोग्याची काळजी घेणे अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या संघ मालकांची पसंती खेळाडूंच्या निवासासाठी हॉटेलऐवजी रिसॉर्टलाच आहे. या दिशेने पावले उचलण्यात सुरुवातही झाली आहे.

सनरायझर्स हैदराबाद संघ मालकांकडून गोल्फ रिसॉर्टमध्ये खेळाडूंची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी संपर्क साधण्यात आला आहे. तसेच मुंबई इंडियन्स व कोलकाता नाईट रायडर्स या संघ मालकांकडून अबुधाबीमध्ये खेळाडूंचा कॅम्प ठेवण्यात येणार आहे. आपल्या खेळाडूंसाठी कॉम्प्लेक्स भाडय़ाने बुक करण्याची योजना मुंबई इंडियन्सकडून तयार करण्यात आली आहे. एका हॉटेलमधील विंग जरी बुक केली तर रूममधील एसीमध्ये अडकलेल्या धुळीने खेळाडूंना कोरोना विषाणूचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून संघ मालक हॉटेलमध्ये खेळाडूंना ठेवण्यास उत्सुक नाहीत.

यावर एक नजर

  • खेळाडूंना जवळपास 60 दिवस वास्तव्य करावे लागणार आहे. त्यामुळे हॉटेलमधील गर्दीत खेळाडूंची सातत्याने काळजी घेणे अवघड असेल. दुबईतील रिसॉर्ट भव्य असल्यामुळे प्रत्येक खेळाडूला एक रूम देता येणार आहे
  • परदेशातील काही खेळाडूंनी ऑफ डेला गोल्फ खेळण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी केलीय, पण बीसीसीआयकडून अद्याप त्याला ग्रीन सिग्नल दाखवण्यात आलेला नाही
  • एखाद्या खेळाडूला दुखापत झाली किंवा कोरोनाचा संसर्ग झाला, तर त्याचा पर्यायी खेळाडू कोण असेल याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही
  • यूएईत सहा दिवसांऐवजी तीन दिवसांचा क्वारंटाइन कालावधी असावा आणि जेवण हे संपर्काशिवाय असायला हवे असेही संघांकडून बीसीसीआयला सांगण्यात आले आहे
आपली प्रतिक्रिया द्या