IPL गाजवणारे 5 दिग्गज खेळाडू राहिले यंदा ‘अनसोल्ड’, तिसरे नाव वाचून विश्वास बसणार नाही

12569

आयपीएलचा 13 वा हंगाम सुरू होण्यास अवघ्या काही दिवसांचा कालावधी बाकी आहे. सर्व संघ यूएईमध्ये पोहोचले असून जोमाने सराव सुरू आहे. प्रत्येक संघात एकाहून एक धुरंधर आहेत, मात्र गेल्या अनेक आयपीएलमध्ये तुम्ही ज्या खेळाडूंना खेळताना पाहिले त्यातील अनेक दिग्गज यंदा ‘अनसोल्ड’ राहिले. या खेळाडूंना क्रीडा चाहते नक्कीच मिस करतील. पाहूया कोणते आहेत हे दिग्गज खेळाडू…

1. युसूफ पठाण

screenshot_2020-09-14-13-57-15-592_com-android-chrome
हिंदुस्थानकडून खेळलेल्या युसूफ पठाणने आयपीएल स्पर्धाही गाजवली. तळाला येऊन तुफान फटकेबाजी करण्यात आणि गोलंदाजीत फिरकीच्या बळावर विकेट घेण्यात त्याचा हातखंडा आहे. एक उत्कृष्ट अष्टपैलू असणाऱ्या पठाणने आयपीएलमध्ये 174 लढती खेळल्या असून यात त्याने 3,204 धावा काढल्या आणि 42 विकेट्सही पटकावल्या. यादरम्यान त्याने फलंदाजीत 158 उत्तुंग षटकारही ठोकले. 2012 आमी 2014 ला कोलकाता संघाला स्पर्धा जिंकून देण्यात युसुफचे मोठे योगदान होत्र. मात्र हा दमदार खेळाडू यंदा आयपीएल खेळताना दिसणार नाही.

2. एविन ल्युईस

screenshot_2020-09-14-13-57-25-674_com-android-chrome
वेस्ट इंडिजचा हा डावखुरा फलंदाज आयपीएल 2020 मध्ये खेळताना दिसणार नाही. मुंबई इंडियन्स कडून खेळताना ल्युईसने टॉप ऑर्डरला खेळताना तुफान फटकेबाजी करत चाहत्यांचे मन जिंकले. ल्युईसने आयपीएलच्या 16 लढतीत 430 धावा ठोकल्या आहेत. चांगले प्रदर्शन करूनही तो यंदा अनसोल्ड राहिला.

3. कार्लोस ब्रेथवेट

screenshot_2020-09-14-13-57-38-595_com-android-chrome_copy_700x450
वेस्ट इंडिजचा उंचापुरा अष्टपैलू खेळाडू कार्लोस ब्रेथवेट याने संघाला अनेक अशक्यप्राय विजय मिळवून दिली. आयपीएलमध्येही त्याने आपला जलवा दाखवला. त्याने बेन स्टोक्सला कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानात सलग चार षटकार ठोकले होते हे चाहते अजूनही विसरलेले नाहीत. आयपीएलमध्ये 163.06 च्या सरासरीने 181 धावा आणि 13 विकेट्स घेणारा जा जबरा खेळाडू यंदा आयपीएल खेळताना दिसणार नाही यावर विश्वासही बसत नाही.

4. मार्टिन गप्टिल

screenshot_2020-09-14-13-57-30-679_com-android-chrome
न्यूझीलंडचा आघाडीचा फलंदाज मार्टिन गप्टिल हा देखील यंदा अनसोल्ड राहिला. अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या या खेळाडूचे आयपीएलमध्ये प्रदर्शन यथातथाच आहे. आयपीएलमधील 13 लढतीत त्याला फक्त 270 धावा करता आल्याने यंदा त्याला कोणीही आपल्या संघात घेतले नाही.

5. टिम साउथी

screenshot_2020-09-14-13-57-34-847_com-android-chrome
आयसीसी क्रमवारीत टॉपच्या गोलंदाजाचा समावेश होणारा न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साउथी याने 2012 आणि 2013 च्या हंगामात जोरदार प्रदर्शन केले होते. मात्र यानंतर त्याच्या खेळाचा ग्राफ उतरत गेला आणि संघमालकांच्या मनातूनही त्याचे नाव हळूहळू पुसलं गेले. त्यामुळे यंदा तो अनसोल्ड राहिला.

बीडच्या अंबाजोगाई येथील ‘कलाकार’ IPL गाजवण्यासाठी सज्ज, गतविजेत्या मुंबईच्या संघात समावेश

आपली प्रतिक्रिया द्या