बीडच्या अंबाजोगाई येथील ‘कलाकार’ IPL गाजवण्यासाठी सज्ज, गतविजेत्या मुंबईच्या संघात समावेश

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चा 13 वा मोसम यंदा यूएईमध्ये खेळला जाणार आहे. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. सलामीचा सामना चार वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स आणि तीन वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्ज संघात रंगणार आहे. मुंबईच्या संघात अनेक दिग्गज खेळाडू असून याच संघात असलेला बीडच्या अंबाजोगाई येथील एक खेळाडू यंदा आयपीएल गाजवताना दिसणार आहे. या खेळाडूचे नाव आहे दिग्विजय देशमुख.

गेल्या वर्षी झालेल्या लिलाव प्रक्रियेदरम्यान मुंबई इंडियन्सने दिग्विजय देशमुख (Digvijay Deshmukhयाच्यावर बोली लावत त्याला संघात घेतले. 21 वर्षीय दिग्विजय याने प्रथम श्रेणीचा एक सामना आणि टी-20 च्या लढती खेळल्या आहेत. लिलावात दिग्विजय याची बेस प्राईस 20 लाख रुपये होती. मुंबई इंडियन्सने त्याला बेस प्राईसला खरेदी केले.

IPL 2020 – मुंबई इंडियन्सपुढे जेतेपद राखण्याचे आव्हान, ‘ही’ आहे मुख्य अडचण

विशेष म्हणजे दिग्विजयने हिंदी चित्रपटातही काम केले आहे. 2013 साली आलेल्या ‘काय पो छे’ चित्रपटामध्ये अली नावाच्या बालकलाकाराची भूमिका दिग्विजयने केली होती. अलीची भूमिका या चित्रपटात महत्त्वाची होती. या चित्रपटात सुशांत सिंह राजपूत, अमित साध आणि राजकुमार राव सारख्या कलाकारांचा समावेश होता.

screenshot_2020-09-16-09-25-24-631_com-android-chrome

दरम्यान, दिग्विजय हा उजव्या हाताने फलंदाजी आणि वेगवान गोलंदाजी करतो. त्याने आतापर्यंत 104 धावा केल्या असून 15 विकेटही घेतल्या आहेत.

Photo story – आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे 5 खेळाडू

मुळचा बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील असलेल्या दिग्विजयने मागील हंगामात महाराष्ट्रकडून पदार्पण केले होते. जम्मू-कश्मीरविरोधात खेळताना त्याने 61 धावा केल्या होत्या.

IPL 2020 – सर्वाधिक धावा, विकेट्स ते सर्वाधिक षटकार; 10 प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर

आपली प्रतिक्रिया द्या