
इंडियन प्रीमिअर लीग (IPL 2022) स्पर्धेत बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स (RCB vs KKR) हे दोन संघ आमनेसामने आले. अखेरच्या षटकापर्यंत रोमहर्षक झालेल्या या लढती बंगळुरूने 3 विकेट्सने विजय मिळवला आणि यंदाच्या आयपीएलमधील आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. चार बळी घेणाऱ्या वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) याला सामनावीर पुरस्कार मिळाला. हसरंगाने मैदान मारले असले तरी कर्णधार फाफ ड्यू प्लेसिसला (Faf du Plessis) मात्र दिनेश कार्तिकच्या (Dinesh Karthik) एका खुबीचा फॅन झाला असून त्याने त्याची तुलना थेट टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) याच्यासोबत केली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली होती. आकाशदीपने व्यंकटेश अय्यर आणि सिराजने अजिंक्य रहाणेला बाद केल्यानंतर वानिंदू हसरंगा याने आपल्या फिरकीच्या जाळ्यात बंगळुरुच्या फलंदाजांना अडकवले. त्याने चार षटकांमध्ये फक्त 20 धावा देऊन 4 विकेट्स घेतल्या. सामना संपल्यानंतर बोलताना हा विजय आपल्यासाठी आवश्यक होता असे ड्यू प्लेसिसने सांगितले. यादरम्यान त्याने दिनेश कार्तिकचे तोंडभरून कौतुकही केले.
‘मी खूप खुश असून स्पर्धेच्या सुरुवातीलाच कमी धावांनी की असेना पण आम्ही महत्त्वपूर्ण विजय मिळवला आहे. ही छोटी धावसंख्या होती, मात्र आम्ही सकारात्मक खेळ केली आणि वेगवान गोलंदाजांनीही चांगली गोलंदाजी केली. चेंडू स्विंग होत होता, परंतु खेळपट्टीवर असमतोल उसळी घेत होता. दोन तीन दिवसांपूर्वी याच खेळपट्टीवर 200 धावा चोपल्या गेल्या होत्या, परंतु आज फक्त 130 रन काढण्यात आले, असे ड्यू प्लेसिस म्हणाला.
आम्हाला अधिक संयम ठेऊन खेळावे लागेल. ही अनुभवाची गोष्ट असून रन बनवणे आमच्यासाठी कधीच आव्हानात्मक नव्हते. आम्हाला फक्त विकेट वाचवण्याची गरज होती, असे ड्यू प्लेसिस म्हणाले.कार्तिकचे कौतुक करताना तो म्हणाला की, शांत राहण्याच्या बाबतीत दिनेश कार्तिक महेंद्रसिंग धोनीसारखाच आहे, असे तो म्हणाला. कार्तिकने अखेरच्या षटकांमध्ये संजम राखत 7 चेंडूत नाबाद 14 धावा काढत संघाला विजयी केले.
IPL 2022 – कोण उघडणार आज विजयाचे खाते, चेन्नई-लखनौ हे पराभूत संघ आमने-सामने
केकेआरची झुंज अपयशी
तत्पूर्वी केकेआरचा संघ प्रथम फलंदाजी करताना 18.5 षटकांमध्ये 128 धावांत गारद झाला. या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरुची सुरुवातही खराब झाली होती. बंगळुरुचे तीन फलंदाज 17 धावांमध्येच बाद झाले. यानंतर रुदरफोर्डने 28 आणि शाहबाज अहमदन 27 धावा करत संघाला विजयाची कवाडे उघडून दिली. यावर कार्तिकने कळस चढवला आणि बंगळुरूने 19.2 षटकांमध्ये लक्ष्य गाठले.



























































