
तब्बल 65 दिवस, 74 सामने आणि अनेक विक्रमांनी संस्मरणीय ठरलेल्या आयपीएलच्या 18व्या हंगामात विजेत्यांवर बीसीसीआयने कोटींचा वर्षाव केला. क्रिकेटविश्वातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या टी-20 लीग असलेल्या आयपीएलच्या विजेत्या संघासह खेळाडूंवरही बक्षिसांचा मोठा वर्षाव करण्यात आला. आयपीएलच्या झळाळत्या करंडकावर आपले नाव कोरणाऱया रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला तब्बल 20 कोटी रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले तर उपविजेता पंजाब किंग्ज संघ 12.5 कोटी रुपयांच्या बक्षिसांचा मानकरी ठरला. तिसर्या क्रमांकावरील मुंबई इंडियन्सला 7 कोटी, तर चौथ्या स्थानावरील गुजरात टायटन्सला 6.5 कोटी रुपयांची पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत इतरही वैयक्तिक पुरस्कारांनी खेळाडूंचा गौरव झाला.