IPL 2026 – चेन्नईचा सुपडा साफ होण्यामागे 5 खेळाडू ठरले कारणीभूत, चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

IPL 2026 मधील तिसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्स वर 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. गुवाहाटी येथील बरसापारा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सीएसकेचा पूर्ण संघ अवघ्या 127 धावांत आटोपला. त्यानंतर राजस्थानने केवळ 12.1 षटकांत 128 धावांचे लक्ष्य सहज गाठत एकतर्फी विजय नोंदवला.

या सामन्यात चेन्नईचा खेळ अगदीच सुमार राहिला. गोलंदाजांसह फलंदाजांनीही निराशाजनक खेळ केल्याने संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामागे चेन्नईच्या काही प्रमुख खेळाडूंची निराशाजनक कामगिरी कारणीभूत ठरल्याची क्रीडा वर्तुळाच चर्चा आहे. प्रथम फलंदाजी करताना शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन हे तिघेही स्वस्तात बाद झाले. केवळ 6 धावांवर त्यांची विकेट गेल्याने सीएसकेचा डाव कोसळला.

IPL 2026 – चेन्नईला सळो की पळो करून सोडणाऱ्या वैभव सूर्यवंशीने सांगितलं स्फोटक फलंदाजीचं रहस्य, म्हणाला…

फलंदाजानी नाराज केल्यानंतर गोलंदाजांकडून संघाला चमकदार कामगिरीची अपेक्षा होती. मात्र, गोलंदाजांनीही फलंदाजांच्या पावलावर पाऊस ठेवत संघाला आणखी अडचणीत आणलं. नूर अहमद आणि मैट हेनरी हे दोघेही महागडे ठरले. नूरने 2 षटकांत 24 धावा दिल्या, तर हेनरीने 3 षटकांत तब्बल 40 धावा खर्च केल्या. दोघांनाही एकही विकेट घेता आली नाही, ज्याचा फटका संघाला बसला. या खराब कामगिरीमुळेच चेन्नईला या सामन्यात लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला.