IPL 2026 – 157 किमी वेग आणि 10 कोटींचे बजेट; राजस्थान रॉयल्सने ‘या’ 15 वर्षीय वादळासाठी आखला होता खास प्लॅन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा उगवता सितारा 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने क्रिकेट जगतात आपल्या बॅटने खळबळ उडवून दिली आहे. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी राजस्थान रॉयल्सने त्याला 1.1 कोटी रुपयांना विकत घेतले असले तरी, रॉयल्सचे क्रिकेट संचालक झुबिन भरूचा यांनी त्याच्यासाठी तब्बल 10 कोटी रुपयांचे बजेट राखून ठेवले होते. लिलावापूर्वी झालेल्या चाचणीत वैभवची फलंदाजी पाहून भरूचा इतके प्रभावित झाले होते की, कोणत्याही परिस्थितीत या ‘विशाल’ प्रतिभेला संघात घेण्याचा आदेश त्यांनी लिलाव टीमला दिला होता.

वैभवची क्षमता तपासण्यासाठी राजस्थान रॉयल्सने तळेगाव येथील त्यांच्या अकादमीत 6 फूट उंचीचे वेगवान गोलंदाज आणि ‘साईडआर्म’ तज्ज्ञांची फौज उभी केली होती. भरूचा यांनी एका थरारक प्रसंगाचा खुलासा करताना सांगितले की, एका सराव सत्रात वैभवने ताशी 157 किमी वेगाच्या चेंडूवर थेट साईटस्क्रीनच्या वरून षटकार ठोकला होता. इतक्या कमी वयात अशा अफाट वेगाचा सामना करणे ही सामान्य बाब नाही, असे मत व्यक्त करत त्यांनी वैभवची तुलना संजू सॅमसन आणि यशस्वी जयस्वाल यांच्या सुरुवातीच्या काळातील प्रतिभेशी केली.

लाजिरवाणे! भाडं भरलं नाही म्हणून हिंदुस्थानी फुटबॉल संघाचे प्रशिक्षक आणि खेळाडूंना मैदानात प्रवेश नाकारला, सुरक्षा रक्षकांनी गेटवरच रोखलं

गेल्या आयपीएल हंगामात 35 चेंडूत शतक ठोकून ‘हाऊसहोल्ड नेम’ बनलेला वैभव आता 16 व्या वर्षात पदार्पण करत आहे. नुकत्याच झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात त्याने 80 चेंडूत 175 धावांची वादळी खेळी करून ‘मॅन ऑफ द टूर्नामेंट’चा किताब पटकावला. मात्र, आगामी आयपीएलच्या हंगामात त्याच्यासमोर मोठे आव्हान असेल.