
घर खरेदी करण्यास इच्छुक नागरिकांना आता पोस्टामधूनही स्वस्त गृहकर्ज (होम लोन) मिळू शकणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (आयपीपीबी) त्यासाठी एचडीएफसी बँकेबरोबर सामंजस्य करार केला आहे. त्याचा लाभ आयपीपीबीच्या सुमारे 47 दशलक्ष ग्राहकांना होणार आहे. देशभरातील आयपीपीबीच्या 650 शाखा आणि 1 लाख 36 हजार बँकिंग अॅक्सेस पॉईंट्समध्ये ग्राहकांना गृहकर्जासाठी जाता येणार आहे.
एचडीएफसी बँकेकडून गृहकर्ज पुरवले जाते. परंतु एचडीएफसीचे जाळे पोस्टाइतके देशाच्या कानाकोपऱयात पसरलेले नाही. ग्रामीण भागांतील नागरिकांनाही गृहकर्ज सेवा पुरवता यावी यासाठी एचडीएफसीने आयपीपीबीशी करार केला आहे. आता बँकेला आपली शाखा नसलेल्या भागांमध्येही आयपीपीबीच्या माध्यमातून ही सेवा पुरवता येणार आहे. पोस्टाच्या नेटवर्कचा लाभ त्यासाठी मिळणार आहे.
दोन लाख बँपिंग सेवा प्रदात्यांकडून गृहकर्ज ऑफर
- आयपीपीबी आपल्या सुमारे दोन लाख बँपिंग सेवा प्रदात्यांद्वारे तसेच पोस्टमन्सद्वारे ग्राहकांना गृहकर्ज ऑफर करणार आहे. कर्जाच्या उपलब्धतेचे काम कराराप्रमाणे आयपीपीबी करणार असून कायदेशीर प्रक्रिया आणि वितरणाची जबाबदारी एचडीएफसी हाताळणार आहे.
- आयआयपीबी ही स्थापनेपासूनच ग्राहकांना विविध सेवा देत आली आहे.



























































