Breaking – नागरिकत्त्व सुधारणा विधेयकाच्या निषेधार्थ IPS अब्दूर रहमान यांचा राजीनामा

3892

महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील IPS अधिकारी अब्दूर रहमान यांनी नागरिकत्त्व सुधारणा कायद्याच्या निषेधार्थ तडकाफडकी राजीनामा दिला आहे. सोशल मीडियावर त्यांनी आपले राजीनामापत्र पोस्ट केले आहे.

‘हे विधेयक हिंदुस्थानच्या धार्मिक एकतेविरोधात आहे. मी न्यायप्रेमी लोकांना विनंती करतो की सर्वांनी या लोकशाही पद्धतीने या विधेयकाला विरोध करावा. हे सर्व घटनेच्या मुलभूत तत्वांविरोधात सुरू आहे’, असे नमूद करत IPS अधिकारी अब्दूर रहमान यांनी राजीनामा दिला.

अब्दूर रहमान हे 1997 बॅचचे IPS अधिकारी आहेत. रहमान याची नुकतीच वायरलेस उपमहानिरीक्षक पदावरून बढती होऊन मानवी हक्क आयोगाच्या महानिरीक्षक पदी नियुक्ती झाली होती. रहमान यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.

बुधवारी नागरिकत्व (सुधारणा) विधेयक राज्यसभेमध्ये मांडण्यात आले. अनेक तासांच्या वादळी चर्चेनंतर हे विधेयक 125 विरुद्घ 105 मतांनी मंजूर करण्यात आले. राज्यसभेपूर्वी हे विधेयक लोकसभेमध्येही मंजूर करण्य़ात आल्याने आता याचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात येईल. या विधेयकाला ईशान्येकडील राज्यांनी विरोध केला असून ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे.

नागरिकता सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर

आपली प्रतिक्रिया द्या