आम्ही अमेरिकेचे थोबाड फोडले! खामेनी कडाडले

Khamenei Declares

इराण-इस्रायलमधील युद्धबंदीनंतर प्रथमच केलेल्या जाहीर भाषणात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनी यांनी अमेरिकेवर सडकून टीका केली. ’आम्ही केवळ जिंकलोच नाही तर अमेरिकेचे थोबाड फोडले,’ असे खामेनी म्हणाले.

‘इराणधील अणु केंद्रांवर हल्ला करून अमेरिकेने युद्धात थेट उडी घेतली. आपण युद्धात उतरल्यामुळे इस्रायलला वाचवता येईल असे अमेरिकेला वाटले होते. पण त्यांचे सगळे मनसुबे आम्ही उधळले. या युद्धातून अमेरिकेला काडीचा फायदा झाला नाही. त्याचं कुठलंही उद्दिष्ट साध्य झालं नाही. इराणला त्यांनी कमी लेखले, पण आम्ही केवळ जिंकलोच नाही तर अमेरिकेचे तोंड पह्डले. भविष्यात इराणवरील कुठलेही आक्रमण खूप महागात पडेल,’ असा इशारा खामेनी यांनी दिला.

ट्रम्प नुसती चमकोगिरी करतात!

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर खामेनी यांनी शेलक्या शब्दांत टीका केली. ‘इराण-इस्त्र्ाायल युद्धाच्या काळात जे काही झाले, त्याविषयी ट्रम्प सतत अतिशयोक्ती करत होते. कारण, त्यांना सत्य लपवायचे होते. ट्रम्प यांना फक्त शोबाजी करायची असते. त्यांची आक्रस्ताळी भाषा, हावभाव आणि निर्णय ही केवळ राजकीय नौटंकी होती,’ अशा शब्दांत खामेनी यांनी ट्रम्प यांची खिल्ली उडवली.