
आखातात सुरू असलेल्या युद्धाच्या झळा हिंदुस्थानला बसत आहेत. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने हिंदुस्थानमध्ये इंधन टंचाई आणि एलपीजीचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे एलपीजीच्या बुकिंगबाबतही सरकारला मोठा निर्णय घ्यावा लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संसदेतील संबोधनादरम्यान ‘कठोर परिस्थिताला सामोरे जाण्यास तयार रहा’, असे म्हटले होते. यानंतर लॉकडाऊनच्या अफवांचा बाजार उठला आणि पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या रांगा लागल्या. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. यामुळे या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील युद्ध आणि देशातील इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत बुधवारी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. पण या बैठकीत पंतप्रधान मोदी उपस्थित नसल्याने विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. सर्वपक्षीय बैठकीनंतर आता उद्या पंतप्रधान मोदी सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार असल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
PM Narendra Modi will interact with CMs tomorrow evening through video conferencing on the West Asia conflict to review preparedness and plans of states. Meeting to focus on ensuring synergy of efforts in the spirit of ‘Team India’. pic.twitter.com/CxOKdk2HcV
— ANI (@ANI) March 26, 2026
बैठकीचा उद्देश काय?
- जागतिक अनिश्चिततेच्या काळात केंद्र सरकार आणि राज्यांमध्ये माहितीची देवाणघेवाण आणि समन्वय राखणे
- पुरवठा साखळी, ऊर्जेची उपलब्धता आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमधील सज्जतेचे आकलन करणे
दरम्यान, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्यामुळे तेथील मुख्यमंत्री आचारसंहितेमुळए या बैठकीत सहभआगी होणार नाहीत. त्याऐवजी या राज्यांच्या मुख्य सचिवांची कॅबिनेट सचिवालयामार्फत स्वतंत्र बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला जाईल.



























































