असं झालं तर…आयआरसीटीसीचे अकाऊंट ब्लॉक झाले

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम अर्थात आयआरसीटीसीचे अकाऊंट असेल तरच त्यावरून रेल्वेचे तिकीट बुक करता येते, परंतु, कधी कधी हे अकाऊंट ब्लॉक होते.

जर तुमचे अकाऊंट ब्लॉक झाले तर तुमचे युजर नेम आणि पासवर्ड पुन्हा एकदा तपासून पाहा. जर योग्य नसेल तर लगेच पासवर्ड बदलून घ्या.

जर तुमचे खाते इनऑक्टिव्ह झाले असेल तर आयआरसीटीसीला ई-मेल करून युजर नेम, पासवर्ड, नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि पत्ता पाठवा.

काही वेळा आयडी व्हेरिफिकेशनची गरज पडते. त्यामुळे आधारकार्ड किंवा पॅनकार्ड, मतदान ओळखपत्राची स्कॅन कॉपी पाठवावी लागू शकते.

चुकीचे पासवर्ड टाकल्यास अकाऊंट ब्लॉक केले जाऊ शकते किंवा आधारकार्ड लिंक नसेल, एकाच आयडीवरून जास्त वेळा तिकीट बुकिंग केल्यास अकाऊंट ब्लॉक केले जाऊ शकते.