
मुंबईतील धारावी परिसराच्या पुनर्विकास प्रकल्पात अदानी समूहाला फायदा व्हावा यासाठी निविदेतील अटी व शर्ती बदलण्यात आल्या आहेत का? असा सवाल काँग्रेसने मंगळवारी केला. अटी व शर्तींमध्ये झालेल्या बदलामुळे पहिला यशस्वी बोलीदार बोली प्रक्रियेतून बाहेर पडला आणि निविदा अदानी समूहाकडे गेल्याचा दावा काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला आहे. यासंदर्भात जयराम रमेश यांनी एक पत्रक जरी केले आहे.
यशस्वी बोली लावणारी कंपनी बोली प्रक्रियेपूर्वीच बाहेर पडली – जयराम रमेश
रमेश यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “नोव्हेंबर 2018 मध्ये जेव्हा धारावी प्रकल्पाबाबत निविदा जारी करण्यात आली तेव्हा दुबईस्थित सेक्लिंक टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशनने आपल्या प्रतिस्पर्धी अदानी इन्फ्रास्ट्रक्चरला मागे टाकून सर्वाधिक 7,200 कोटी रुपयांची बोली लावली होती. रेल्वेच्या मालकीच्या जमिनीच्या हस्तांतरणाशी संबंधित समस्यांमुळे नोव्हेंबर 2020 मध्ये ती निविदा रद्द करण्यात आली. महाराष्ट्र सरकारच्या नगर विकास मंत्रालयाने ऑक्टोबर 2022 मध्ये नवीन अटींसह नवीन निविदा जारी केली होती. यावेळी अदानी समूहाने 5,069 कोटी रुपयांची निविदा जिंकली, जी आधीच्या बोलीपेक्षा 2,131 कोटी रुपयांनी कमी आहे.”
निविदेतील अटी व शर्तींमध्ये बदल – जयराम रमेश
जयराम रमेश म्हणाले की, “अटी आणि शर्तींमधील बदलांमुळे सेक्लिंकला पुन्हा बोली लावण्याची संधी मिळाली नाही. तसेच, बोली लावणाऱ्यांसाठी एकूण मालमत्तेची मर्यादा 10,000 कोटी रुपयांवरून 20,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली, ज्यामुळे बोली लावणाऱ्यांची संख्या मर्यादित झाली.
“पंतप्रधान मोदींनी भाजप शासित महाराष्ट्र सरकारला निविदेच्या मूळ विजेत्याला बाहेर फेकण्यासाठी आणि त्यांच्या आवडत्या उद्योग समूहाला पुन्हा मदत करण्यासाठी निविदेतील अटी आणि शर्ती बदलण्यास भाग पाडले का?” असा सवाल यावेळी जयराम रमेश यांनी उपस्थित केला आहे. तसेच मोदानीच्या तावडीतून झोपडपट्टीत राहणारे लोकही सुटणार नाहीत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मोदानी से जुड़े राज लगातार बाहर आ रहे हैं।
शिंदे सरकार ने धारावी परियोजना का टेंडर अडानी को देने के लिए फिर से बोली लगवाई। नियम एवं शर्तों में बदलाव करके टेंडर के पिछले विजेता को बाहर किया और नकदी संकट से जूझ रहे अडानी ग्रुप के लिए भुगतान को आसान बनाया।
इस मामले पर हमारा बयान। pic.twitter.com/b1AMRke6g6
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) April 18, 2023


























































