राहुल गांधी हिंदू आहेत की नाही? भाजपचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हिंदूंच्या मतांसाठी मंदिरांची दर्शने घेत फिरतात. पण त्यांचे नेते मात्र अयोध्येत राम मंदिर उभारणीच्या कार्यात खोडा घालणारी विधाने करीत फिरत आहेत. राहुल हे हिंदू आहेत की नाहीत हे त्यांनी आधी स्पष्ट करावे आणि नंतर आपण शिवभक्त असल्याचा दावा करावा असा पलटवार भारतीय जनता पक्षाने केला आहे.

भाजप प्रवक्ते जी व्हीं एल नरसिंहराव यांनी काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या आदर्श हिंदू एखाद्या धर्माचे प्रार्थनास्थळ तोडलेल्या जागेवर राममंदिर बांधण्याच्या योजनेला पाठिंबा देणार नाहीत या वक्तव्यावर टीकेची झोड उठवली. आम्ही अयोध्येत राम मंदिर उभारणारच आहोत, पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहोत. हिंदूंच्या मतांसाठी आतुर झालेल्या काँग्रेसने मात्र राम मंदिर उभारणीबाबत आपले स्पष्ट धोरण अद्याप जाहीर केलेले नाही. यातच त्यांचा वोट बँक पॉलिटिक्सचा डाव उघड होतोय, असा आरोप राव यांनी केला.