
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
जम्मू कश्मीरमधील तैनात हिंदुस्थानी सैनिकांना सातत्याने दहशतवाद्यांकडून लक्ष्य केले जात आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआय दहशतवाद्यांच्या मदतीने हिंदुस्थानी सैन्याला लक्ष्य करण्याच्या तयारीत आहे. आयएसआय आणि पाकिस्तानी सैन्याने जम्मू कश्मीरमधील हिंदुस्थानी सैनिकांच्या अन्न धान्यात विष कालवण्याचा कट रचला असून सुरक्षा दलाला मिळालेल्या एका चिठ्ठीवरून ही कट उघडकीस आला आहे.
ही बातमी सुरक्षा दलाला मिळाल्यानंतर जम्मू कश्मीरमधील पोलीस अधिकारी आणि सैन्याचे अधिकारी हाय अलर्टवर आहेत. जम्मू कश्मीरच्या सर्व सैनिक तळावरील धान्य कोठारावर तपास सुरू केला आहे. तसेच सुरक्षेचा उपाय म्हणून देशाच्या सर्व सैनिक तळावरीलही धान्य कोठारावर तपासणी सुरू आहे.



























































