
भारतीय जनता पक्षाच्या खासदार मनेका गांधी यांचा इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉनशिअसनेस (इस्कॉन) ही ‘देशातील सर्वात मोठी फसवणूक आहे आणि ते त्यांच्या गोशाळांमधून गायी कसाईंना विकतात’ असा आरोप करणारा त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, माजी केंद्रीय मंत्री आणि प्राणी हक्क कार्यकर्त्या असं म्हणताना ऐकू येत आहे की, ‘इस्कॉन गोशाळा स्थापन करते आणि सरकारकडून मोठ्या जमिनीच्या रूपानं अमर्याद लाभ मिळवते’.
धार्मिक संघटनेवर टीका करताना मेनका गांधी म्हणाल्या, ‘मी नुकतीच त्यांच्या अनंतपूर गोशाळेला (आंध्र प्रदेश) भेट दिली आणि तिथे एकही गाय सुस्थितीत आढळली नाही’.
‘गौशाळेत एकही वासरू नव्हते, याचा अर्थ ते सर्व विकले गेले’, असा आरोप मनेका गांधी यांनी केला.
‘इस्कॉन आपल्या सर्व गायी कसाईंना विकत आहे आणि त्यांच्यापेक्षा हे दुसरे कोणीही करत नाही. तेच ते आहेत जे ‘हरे रामा हरे कृष्ण’ म्हणत रस्त्यावर फिरतात आणि म्हणतात की त्यांचं संपूर्ण आयुष्य दुधावर अवलंबून आहे’, असं व्हिडीओमध्ये बोलताना पाहायला मिळत आहे.
इस्कॉननं मनेका गांधी यांचे आरोप ‘निराधार आणि खोटे’ असल्याचं म्हणत फेटाळून लावले. तसंच माजी केंद्रीय मंत्र्यांच्या विधानावर ‘आश्चर्य’ व्यक्त केलं.
इस्कॉनचे राष्ट्रीय प्रवक्ते युधिष्ठिर गोविंदा दास यांनी निवेदनात म्हटलं आहे की, ‘जगातील अनेक भागांमध्ये इस्कॉननं गायींच्या संरक्षणासाठी पुढाकार घेतला आहे, जेथे गोमांस हा मुख्य आहार आहे’.




























































