इस्लामपूरमधून 29 नागरिक धारूरच्या क्वारंटाईनमध्ये दाखल

3420

एकाच कुटूंबात 23 व्यक्तींना कोरोनाचा लागण झालेल्या इस्लामपूर मधून धारूरमध्ये आलेल्या 29 नागरिकांना शनिवारी मध्यरात्री सतर्क असलेल्या आरोग्य विभागाने क्वारंटाईनमध्ये ठेवले आहे. त्यांच्या वर करडी नजर ठेवण्यात येत असून 14 दिवस त्यांच्या आरोग्याची रोज तापसणी केली जाणार आहे.

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे एकाच कुटुंबातील तब्बल 23 जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याने राज्यात खळबळ माजली होती. याच इस्लामपूर मधून 29 नागरिक शनिवारी आपल्या गावी परतण्यासाठी धारूरमध्ये दाखल झाले. याची माहिती आरोग्य विभागाला मिळताच मोठ्या शर्थीने या नागरिकांशी संपर्क करून सर्व नागरिकांना मध्य रात्री एक वाजता धारूर येथे सज्ज ठेवण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले.

या सर्व नागरिकांच्या आरोग्याचा काळजी घेतली जात आहे. त्यांची रोज आरोग्य तपासणी केली जाणार आहे 14 दिवस हे नागरिक विलगीकरण कक्षात राहणार आहेत. हे सर्व नागरिक ऊस तोड कामगार असल्याचे बोलले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या