
खोदकामादरम्यान तब्बल एक हजार वर्षांपूर्वीचं काेंबडीचं अंडे सापडलं आहे. इस्राईलमध्ये ही घटना घडलीय. जगातील हे सर्वाधिक जुनं अंडे असल्याचा दावा इस्राईलच्या आर्पलॉजिकल विभागाने केला आहे. विशेष म्हणजे हे अंडे सुरक्षित अवस्थेत सापडलं, मात्र सफाई करताना ते फुटलं आहे. या अंडय़ाचे फोटो इस्राईलच्या आर्पलॉजिकल विभागाने फेसबुकवर पोस्ट केले असून त्यावर सविस्तर पोस्ट लिहिली आहे. इस्राईलच्या यावने शहरात खोदकामादरम्यान हे अंडे सापडलं आहे.
हे अंडे दहाव्या शतकातील असल्याचा अंदाज संशोधकांना आहे. खोदकामात अंडय़ाचं कवच मिळणं ही साधारण बाब आहे; परंतु पूर्ण अंडे सुरक्षित अवस्थेत मिळणं ही दुर्मिळ घटना असल्याचे आर्पलॉजिकल विभागाचे विशेषज्ञ डॉक्टर ली पेरी गाल यांनी म्हटले आहे.






























































