
हिंदुस्थानी अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) अंतराळ मोहिमांच्या तयारीत खासगी क्षेत्राचा सहभाग असावा हीच केंद्राची योजना आहे. त्याचा अर्थ इस्रोचे खासगीकरण होतेय असा मुळीच घेऊ नका. उलट या निर्णयामुळे आपल्या अंतराळ मोहिमांना अधिक गती मिळेल. अंतराळ संशोधनात अग्रेसर असलेल्या इस्रोवर सरकारचेच नियंत्रण कायम राहील, असे स्पष्टीकरण इस्रोचे प्रमुख के. सिवान यांनी केले आहे.
नव्या खासगी भागीदारीमुळे इसरोला आता अग्निबाण अथवा उपग्रहांचे सुटे भाग बनविण्याकडे फारसे लक्ष द्यावे लागणार नाही. तो वेळ अंतराळ मोहिमांचे नियोजन, विकासकार्य आणि संशोधनासाठी वापरता येईल, असे प्रतिपादन इसरो प्रमुख सिवान यांनी केले. आत्मनिर्भर भारत योजनेची खऱया अर्थाने अंमलबजावणी इस्रोतील नव्या सरकार-खासगी भागीदारीतून होईल असाही दाका सिवान यांनी केला.




























































