चंद्र आहे साक्षीला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चांद्रयान-3 आता चंद्राच्या खूप जवळ पोहोचले आहे. ‘इस्रो’च्या चंद्र मोहिमेला गुरुवारी मोठे यश मिळाले आहे. प्रोपल्शन मॉडय़ूलला लँडर विक्रमपासून यशस्वीपणे वेगळे करण्यात आले. आता ‘इस्रो’ने ‘चांद्रयान-3’ने काढलेला चंद्राचा व्हिडीओ शुक्रवारी समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ चंद्राच्या खूपच जवळचा आहे. ‘इस्रो’ने शुक्रवारी चंद्राचे दोन व्हिडीओ शेअर केलेत. ज्यात पहिला व्हिडीओ 15 ऑगस्टचा तर दुसरा व्हिडीओ 17 ऑगस्टचा आहे. लँडर मॉडय़ूल प्रोपल्शन मॉडय़ूलपासून वेगळे झाल्यानंतरचा 17 ऑगस्टचा व्हिडीओ आहे.

‘इस्रो’कडून नवा फोटो शेअर

चांद्रयान-3 चे विक्रम लँडर आता 113 x 157 च्या कक्षेत आले. म्हणजेच चंद्रापासून फक्त 113 किमी दूर आहे. इस्रोने डी बूस्टिंग द्वारे चांद्रयानची कक्षा कमी केली. लँडरचे चंद्रापासून कमीत कमी 30 किमी अंतर राहील. 23 ऑगस्टला सायं. 5.45 वाजता चंद्रावर लँडिंग होईल. इस्रोने 17 ऑगस्टला चांद्रयानच्या प्रोपल्शन मॉडय़ूलला लँडर-रोवरपासून वेगळे केले होते. या दरम्यान लँडरवरील पॅमेऱयाने प्रोपल्शन मॉडय़ूलच्या सोबत चंद्राचा फोटो काढला.

– ’चांद्रयान-3’च्या विक्रम लँडरच्या एलपीडीसीद्वारा व्हिडीओ पॅप्चर.
– दुसऱया व्हिडीओत पृथ्वीची एक झलक दिसत आहे.
– ’चांद्रयान-3’ च्या लँडर मॉडय़ूलची डी बूस्टिंगची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण.
– चांद्रयान लँडरच्या चार पायात 800 न्यूटन शक्तीचे 1-1 थ्रस्टर.
– दोन दोन थ्रस्टर दोन टप्प्यात काम करतील.