
सामना ऑनलाईन । श्रीहरीकोट्टा
श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हिंदुस्थानी अंतराळ संशोधन संघटनेने ( इस्रो ) जीसॅट-29 या आतापर्यंतच्या सर्वात वजनदार हिंदुस्थानी दळणवळण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. जीएसएलव्ही -एमके -घ्घ्घ् डी-2 या प्रक्षेपक यानाद्वारे उपग्रह अवकाशात झेपावला. पुढील चार वर्षांत होऊ घातलेल्या हिंदुस्थानच्या चांद्रयान-2 आणि मानवी अंतराळ मोहिमांआधी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण इस्रोचे मनोबल उंचावणारे ठरणार आहे. जीसॅट-29 उपग्रहाचे वजन 3,423 कि. ग्रॅ. असून तो देशाचा आतापर्यंतचा सर्वात वजनदार उपग्रह आहे. हा उपग्रह प्रामुख्याने जम्मू-कश्मीर आणि ईशान्य हिंदुस्थानातल्या दळणवळण क्षेत्राचा विकास करण्यासाठी पुढील दहा वर्षांसाठी कार्यरत राहणार आहे. हिंदुस्थानचा हा अत्याधुनिक आणि प्रभावी परिणाम देणारा दळणवळण उपग्रह आहे.


























































