299 रुपयांत स्मार्टफोन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आईटेलने गुरुवारी बजाज फिनसर्वशी भागीदारीची केली आहे. या योजनेअंतर्गत आईटेल स्मार्टफोन ए 48, ए 25प्रो, व्हिजन 1 जीबी आणि व्हिजन 1 प्रो देत आहे जे फोर जी एलटीई आणि ट्रेंडी वैशिष्टय़ांसह आहेत. हे फोन झिरो डाऊन पेमेंट आणि नो-कॉस्ट ईएमआयसह उपलब्ध आहेत. हे स्मार्टफोन ग्राहकांना केवळ 299 रुपयांत खरेदी करता येईल. उर्वरित पेमेंट चार सुलभ ईएमआयद्वारे करावे लागेल. ही योजना बजाज फिनसर्व्ह ईएमआय नेटवर्क कार्डच्या विद्यमान ग्राहकांना लागू आहे.