
सामना प्रतिनिधी । मुंबई
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राज्यातील आयटीआय प्रवेशाची पहिली प्रवेशफेरी २ जुलैला जाहीर होणार आहे. या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी ३ ते ६ जुलैदरम्यान संबंधित संस्थेत जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. आयटीआय प्रवेशाची प्राथमिक गुणवत्ता यादी २५ जून रोजी सकाळी ११ वाजता जाहीर होणार असून या वेबसाईटवर प्रवेशाचे वेळापत्रक उपलब्ध आहे.
दहावी, बारावी उत्तीर्ण, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आयटीआय हा व्यवसाय शिक्षणाचा महत्त्वाचा पर्याय असून गेल्याकाही वर्षात राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत ऑगस्ट २०१८ च्या सत्रातील ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. आयटीआय प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थी २० जून सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. तसेच विद्यार्थी-पालकांना प्रवेशप्रक्रियेविषयी मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक प्रशिक्षण संस्थेत ३० जूनपर्यंत सकाळी १० ते ११ यावेळेच मोफत मार्गदर्शन सत्रही होणार आहेत.
दिलेल्या मुदतीत अर्ज न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी
दिलेल्या मुदतीत आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करू न शकणाऱया विद्यार्थ्यांसाठी विशेष समुपदेशन फेरी राबविण्यात येणार आहे. हे प्रवेश २५ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान होतील. समुपदेशन फेरीतील पात्र उमेदवार व नव्याने अर्ज भरलेल्या उमेदवारांची एकत्रित गुणवत्ता यादी १० ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे.
आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक
ऑनलाईन अर्ज सादर करणे – २० जून सायंकाळी ५ पर्यंत
प्रवेशअर्ज निश्चित करणे – २१ जून सायंकाळी ५ पर्यंत
पहिल्या प्रवेशफेरीसाठी प्राधान्यक्रम सादर करणे – २२ जून सायंकाळी ५ पर्यंत
प्राथमिक गुणवत्ता यादी – २५ जून सकाळी ११ वाजता
गुणवत्ता यादी हरकती नोंद – २५ ते २६ जून सायंकाळी ५ पर्यंत
अंतिम गुणवत्ता यादी – २८ जून सायंकाळी ५ वाजता
पहिली प्रवेशफेरी – २ जुलै सायंकाळी ५ वाजता
पहिल्या यादीनुसार प्रवेश – ३ ते ६ जुलै
दुसरी प्रवेश फेरी – १२ जुलै सायंकाळी ५ वाजता
दुसऱ्या यादीनुसार प्रवेश – १३ ते १७ जुलै
तिसरी प्रवेश फेरी – २४ जुलै सायंकाळी ५ वाजता
तिसऱ्या यादीनुसार प्रवेश – २५ ते २८ जुलै
चौथी प्रवेश फेरी – ३ ऑगस्ट सायंकाळी ५ वाजता
चौथ्या यादीनुसार प्रवेश – ४ ते ८ ऑगस्ट




























































