जैन, गुजराती व सिंधी समाजाकडून ‘प्री वेडिंग शूट’वर, लग्नात महिलांच्या नाचण्यावर बंदी

1724

हल्ली लग्नाच्या आधी ‘प्री वेडिंग शूट’ करण्याचा ट्रेंड चांगलाच रुजला आहे. लग्नाच्या आधी एकमेकांसोबत सुंदर फोटो काढून, त्या अविस्मरणीय क्षणांच्या आठवणी आयुष्यभर जपता याव्यात ही त्यामागची संकल्पना आहे. मात्र भोपाळमधील जैन, गुजराती आणि सिंधी समाजाकडून लग्नाआधीच्या फोटोशूटवरच बंदी घालण्यात आली आहे. भोपाळमधील या समाजांच्या संघटनेने लग्न ठरलेल्या जोडप्यांसाठी काही नवे नियम लागू केले आहेत.

भोपाल गुजरात समाज आणि गुजराती समाज या संघटनांचे राष्ट्रीय सचिव संजय पटेल यांनी ही माहिती दिली आहे. ‘लग्नाआधी करण्यात येणाऱ्या प्री वेडिंग शूटवर बंदी घालण्यात आली आहे. आम्ही याबाबतचे पत्रक सर्व समाजामध्ये वाटले आहे. बऱ्याचदा असं होतं की, लग्न अकाली तुटतात. त्यामुळे हा एक सामूहिक निर्णय आहे, जो याचं पालन करणार नाही, त्यांचा समाजातून बहिष्कार केला जाईल, असं पटेल यांचं म्हणणं आहे.

तसंच जैन समाजाने लग्नसोहळ्यांमध्ये संगीत कार्यक्रमात कोरिओग्राफीसाठी पुरुषांवर बंदी घातली आहे. लेडीज संगीतमध्ये यापुढे पुरुष कोरिओग्राफर असणार नाही, अशीही परिपत्रकं जारी करण्यात आली आहेत. एका जैन समाजातील आध्यात्मिक गुरूंनी सर्वप्रथम या प्रकाराकडे लक्ष वेधल्याचं जैन समाजाचे प्रमोद जैन यांनी सांगितलं आहे. या गुरूंनी प्री वेडिंग शूट हे अश्लील वाटत असल्याचं तसंच त्यामुळे सामाजिक नात्यांवर याचा परिणाम होत असल्याचं म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या