जयपूर साखळी बॉम्बस्फोटांतील चारही आरोपींना फाशीची शिक्षा

526

जयपूरमध्ये अकरा वर्षांपूर्वी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी आढळलेल्या चारही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जयपूर साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी मोहम्मद सैफ, सरकर आजमी, सैफुर्रहमान आणि मोहम्मद सलमान यांना विशेष न्यायालयापुढे सादर करत सरकारी वकिलांनी फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती.

जयपूरमधील परकोटे भाग 13 मे 2008 रोजी 8 साखळी बॉम्बस्फोटांनी हादरला होता. या बॉम्बस्फोटांत 71 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता तर 185 जण जखमी झाले होते. या प्रकरणातील चार आरोपींना दोनच दिकसांपूर्वी 18 डिसेंबर रोजी जयपूरच्या किशेष न्यायालयाने दोषी ठरकले होते. या चारही आरोपींना आज शिक्षा ठोठाकण्यात आली. या प्रकरणातील पाचवा आरोपी शाहबाज हुसेन याची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

तीन आरोपी अद्यापही फरार
जयपूर स्फोटप्रकरणी एकूण 13 जणांना पोलिसांनी आरोपी बनवले होते. त्यातील 3 आरोपी अद्यापही फरार आहेत तर 3 हैदराबाद आणि दिल्लीमधील तुरुंगात आहेत. 2 आरोपींना दिल्लीतील बाटला हाऊस येथे झालेल्या चकमकीत ठार मारण्यात आले होते. फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्यांना देशद्रोह आणि किस्फोटक अधिनियमअंतर्गत दोषी ठरकले. जयपूर बॉम्बस्फोटांतील तीन आरोपींचा अहमदाबाद आणि दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटांतही सहभाग असल्याचे आढळून आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या