
सामना ऑनलाईन। जयपूर
माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग हे राजस्थानातून राज्यसभेवर जाणार आहेत. या जागेसाठी होणाऱया पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात येणार आहे. 13 ऑगस्ट रोजी सिंग हे आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत.
दरम्यान, यापूर्वी राजस्थान विधानसभेतील आमदारांच्या एका कार्यक्रमाच्या समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. त्यानंतर ते राजस्थानातून राज्यसभेवर जाणार असल्याची चर्चा होती. राजस्थान भाजपचे माजी अध्यक्ष मदनलाल सैनी यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी येत्या 26 ऑगस्ट रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी करून निकालही जाहीर करण्यात येणार आहे.






























































