
जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तीन अतिरेकी हिंदुस्थानात घुसले आहेत. हे दहशतवादी हिंदुस्थानात मोठी अतिरेकी कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. या दहशतवादांच्या रडावर दिल्ल्ली आणि व्हीआयपी लोक आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आआयएसआय ने हिदुस्थानात घातपात करण्यासाठी योजना आखली आहे. त्यानुसार जैश ए मोहम्मदचे तीन दहशतवादी हिंदुस्थानात पाठवले आहेत. गुल जान, जुम्मा खान आणि शकील अहमद असे या दहशताद्यांची नावे असून सर्व दहशतवादी पाकिस्तानचे रहिवासी आहेत.
हे तिनही दहशतवादी जैशचा म्होरक्या मुफ्ती अब्दुल रउस असगरचे जवळचे आहेत. तिनही दहशतवादी हिंदुस्थानात घुसण्यापूर्वी जैश आणि आयएसआयची एक बैठक पार पाडली. तिनही दहशतवाद्यांना अफगाणिस्तानमध्ये प्रशिक्षित करण्यात आले होते. तसेच तिघांना अफगाणिस्तानच्या ओळखपत्रावर हिंदुस्थानात पाठवण्यात आले आहे.
गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार तिनही दहशतवादी जम्मू कश्मीरच्या सियालकोट भागातून हिंदुस्थानात घुसले होते. सुरक्षा यंत्रणांना हे तिनही दहशतवादी अनंतनागमध्ये शेवटी दिसले होते. या तिघांसोबत दोन कश्मीरी असून ते या तिघांना मदत करत असल्याचे समोर आले आहे. दिल्ली आणि दिल्लीतील व्हीआयपी लोक या दहशतवाद्यांच्या रडारवर असून सुरक्षा यंत्रणा ऍलर्ट वर आहेत.
या तिनही दहशतवाद्यांकडे काही नकाशे आहेत. तसेच तिघांना आत्मघातकी हल्ल्याचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. सध्या सगळी सुरक्षा यंत्रणा या तिघांचा शोध घेत आहेत.






















































