
शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत महिला प्रतिनिधी गटातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माधुरी सावगावे या बिनविरोध निवडून आल्या.
माधुरी सावगावे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कुरुंदवाड येथील शिवसेना शहर कार्यालयात उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, अप्पासो भोसले, राजू आवळे, उपतालुकाप्रमुख युवराज घोरपडे, संजय अनुसे यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना शिरोळ तालुक्याच्या वतीने बाजार समितीच्या नवनिर्वाचित सदस्या माधुरी सावगावे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुकाप्रमुख वैभव उगळे, वैशाली जुगळे, बाबासो सावगावे, दयानंद मालवेकर आदी प्रमुख उपस्थित होते. बाजार समितीत राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीचे सात उमेदवार बिनविरोध झाले आहेत.

























































