जालन्यात 101 कोरोना बाधित रुग्णांची भर, एकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आज जालना येथील कोविड सेंटर उपचार घेत असलेल्या एका कोरोनाग्रस्ताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर आज १०१ कोरोना बाधितांची भर पडली आहे. तर ४४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे बळीची संख्या २४२ वर गेली असून कोरोना बाधितांची संख्या ९ हजार ३७४ इतकी झाली आहे. यापैकी यशस्वी उपचारानंतर ७ हजार ३१३ रुग्ण बरे झाले आहेत. तर आजपर्यंत अ‍ॅक्टीव्ह रुग्ण संख्या १ हजार ८१९ इतकी आहे.

आज कोविड हॉस्पीटल जालना येथे अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील ७० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. तर जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार आज ११ ऑक्टोंबर रोजी डेडीकेटेड कोविड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर, कोविड केअर सेंटरमधील ४४ रुग्णांस डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज जालना तालुक्यातील जालना शहर २, खनेपुरी १, वाघ्रâळ १, प्रितीसुधानगर ४, समर्थनगर १, सकलेचानगर १ रुग्ण, मंठा तालुक्यातील तळणी १ रुग्ण आढळून आला आहे. घनसावंगी तालुक्यातील अंतरवाला १, मुरमा १, रामसगाव १, पिंपरखेड २, वुंâभारपिंपळगाव २, चित्रवडगाव २, मंगु जळगाव १, कृष्णनगर १, माहेर जवळा तांडा १, आंतरवाली टेंभी २, घनसावंगी शहर १, कृष्णनगर तांडा १, घोंन्सी तांडा १, गुरुपिंपरी १ रुग्ण आढळून आला आहे. अंबड तालुक्यातील शहापुर १, चांगलेनगर १, होळकरनगर १, सोनक पिंपळगाव १, इंदिरानगर १, तिर्थपुरी १, मारोती मंदिर १, लक्ष्मीपुरा १, कासोळी १, दुधपुरी १, भणंग जळगाव १, नुतनवसाहत १, अंबड शहर १, विकासनगर १, पाथरवाला १, शहागड २, एकलहेरा ५, पंचायत समिती ८, कोर्ट रोड १, गणपती गल्ली १ रुग्ण आढळून आला आहे. बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण ९, गवळीवाडी ६ रुग्ण आढळून आले आहेत. इतर जिल्हे बुलढाणा जिल्हा ७, अशा प्रकारे आरटीपीसीआर तपासणीव्दारे ८३ व्यक्तींचा व अँटीजेन तपासणीव्दारे १८ व्यक्तींचा अशा एकुण १०१ व्यक्तींचा अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली आहे.