गाडी चालवताना चालकाला आकडी आली, गाडी थेट दुकानात घुसली, लाखोंचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इन्होवा क्रिस्टा कारच्या चालकाला अचानक आकडी आल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी टायरच्या दुकानात घुसल्याची घटना जालन्यात 2 जुलै रोजी घडली आहे.

जालना शहरातील भोकरदन नाका परीसरात ही घटना घडली. या घटनेत टायरच्या दुकान मालकाचे लाखो रूपयाचे नुकसान झालं असून दुकानमालक दोन बांधव तसेच एका मॕकानिक ला किरकोळ मुक्का मार लागला असल्याचे दुकान मालकाने सांगीतले. कार दुकानात घुसल्याचे पाहताच आजूबाजूच्या संतप्त नागरीकांनी गाडीच्या काचा फोडल्या.

दरम्यान गाडी मध्ये चालक बेशुध्द अवस्थेत असल्याचे निदर्शनास आल्याने घटनेचे गांभीर्य ओळखून दुकान मालकांनी ड्रायव्हरला शहरातील खासगी दवाखान्यात दाखल केले असता डाॕक्टरांनी त्यास तपासून फीट आलेले असल्याचे सांगीतले.(एमएच 21-बी एफ 2223) असे ईनोव्हा गाडीचा नंबर असून दुकान मालकांनी सदरील गाडी मालकास फोन वरून घटनेची माहिती कळवली असता गाडी मालकाने सांगितले की आजच गाडी चालकाला फिट आलेला आहे. यापूर्वी कधीही फिट आलेला नव्हता. दरम्यान फीट चा झटका येत असलेल्या ड्रायव्हरला ड्रायव्हिंग लायसन दिलं कसं असा सवाल टायर च्या दुकान मालकाने केलं आहे. या घटनेनंतर सदर बाजार पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत तेथील गर्दी हटवून ईनोव्हा गाडी बाजूस घेतली.