
जालना तालुक्यातील भाटेपुरी येथे अंगावर वीज पडून एका 24 वर्षीय तरुण शेतकर्याचा मृत्यू झाला असल्याची घटना आज 12 मे रोजी घडली. विठ्ठल गंगाधर कावळे असे मयत शेतकर्याचे नाव आहे. भाटेपुरी येथील शेतकरी विठ्ठल कावळे हा शेतात मान्सूनपूर्व कामे करण्यासाठी गेला होता. मात्र अचानक दोन वाजेच्या सुमारास विजांच्या गडगडाटांसह वादळी वारा आणि पाऊस सुरु झाला. त्याचवेळी अंगावर वीज कोसळून विठ्ठलचा शेतकर्याचा जागीच मृत्यू झाला. गावकर्यांनी त्याला तात्काळ जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असताना डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले याची माहिती कळताच मृतदेह प्रशासनाने शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधिन करण्यात आला असून भाटेपुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. या घटनेने पंचक्रोशीत शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.