
जळगाव जिल्ह्यात नव्याने घशातील लाळेचे नमुने घेतलेल्या 78 कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज 14 मे रोजी प्राप्त झाले आहेत. यापैकी 56 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून 22 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे रुग्ण संख्या 232 वर पोहोचली आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये भुसावळ येथील एक, जळगाव शहरातील दर्शन कॉलनीतील दोन, गेंदालाल मील परिसरातील एक, पवननगर भागातील एक असे चार रुग्ण आहेत. तसेच चोपडा येथील सात, अडावद येथील एक, भडगाव शहरातील चार व रावेर तालुक्यातील निंभोरा येथील एक, यावल तालुक्यातील फैजपूरमधील एक, यावलमध्ये एक आणि अमळनेर येथील दोन अशा एकूण बावीस रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 232 इतकी झाली आहे. त्यापैकी पस्तीस व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी गेल्या आहेत. तर कोरोनाची लागण झालेल्या 28 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.































































