Jalna News – भरधाव आयशर टेम्पो झाडावर आदळला, अपघातात दोन जण ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना शहरातील कन्हैय्यानगर भागातील सेंट मेरी शाळेसमोर आयशर झाडावर आदळून भीषण अपघात झाला आहे. यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अविनाश लोंढे, रा. डुकरी पिंपरी ता. जि. जालना आणि सुरेश पालवे रा. जिंतूर अशी मृतांची नावे आहेत.

परभणी येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील 5 टन जनावरांचा चारा घेऊन आयशर शिर्डीकडे जात होते. यादरम्यान, हॉटेल व्यवसायिक असणारे डुकरी पिंपरी येथील अविनाश लोंढे हे देखील या आयशरमध्ये बसले होते. जालना शहरातील बायपास मार्गावरून हे आयशर सरळ शिर्डीकडे जाणार असताना ते जालना शहरात घुसले. आयशर भरधाव वेगात असल्याने रात्री 2 वाजण्याच्या सुमारास सेंट मेरी हायस्कूल जवळील वडाच्या झाडाला धडकले.

या भीषण अपघातात मोठ्या आकाराचे अवाढव्य वडाचे झाड मुळासकट उपटले. तर आयशरचे भागात तुटले. या भीषण अपघातात आयशरमध्ये बसलेल्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. सदर बाजार पोलिसांनी तत्काळ मृतांना बाहेर काढून जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले आहे.