
जालना तालुक्यातील वंजार उम्रद येथील एका शेतकर्याच्या कापसाच्या शेतातून तालुका जालना पोलिसांनी तब्बल 23 लाख रुपयांचा 115 किलो गांजा जप्त केला आहे. तालुका जालना पोलिसांनी आज 20 नोव्हेंबर रोजी दुपारी ही कारवाई केली.
जालना तालुक्यातील वंजार उम्रद येथील एका शेतकर्याच्या शेतात प्रतिबंधित गांजा लावलेला होता. कापसाच्या शेतात लावलेला हा 115 किलो गांजा तालुका पोलिसांनी जप्त केला आहे. सयाजी पालवे असे गांजा लागवड करणार्या शेतकर्याचे नाव असून तो माजी ग्राम पंचायत सदस्य असल्याचे समजते. या प्रकरणी सबंधित शेतकर्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सुमारे 23 लाखांचा 115 किलो गांजा देखील जप्त केला आहे.
सध्या या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश जायभाये, सहायक पोलीस निरीक्षक संभाजी वडते, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश खाडे,पोलीस उपनिरीक्षक हरीश राठोड, वनवे, कृषी अधिकारी आकाश वानखडे,पोलीस कर्मचारी संदीप उगले, गणेश नाईकवाडे, पोलीस नाईक राऊत, पोलीस नाईक विष्णु कोरडे, वसंत धस,विलास आटोळे, कृष्णा भडांगे,लक्ष्मण शिंदे अरुण मुंडे, चालक कापसे, नागरे यांच्या पथकाने केली आहे.



























































