निळवंडे धरणाचे जलपूजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाचे जलपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. निळवंडे धरणाचा डावा कालवा नगर जिह्यातील दुष्काळी व जिरायत भागाला सुजलाम् सुफलाम् करणारा हा प्रकल्प पथदर्शी ठरणार आहे. डावा, उजवा, उच्चस्तरीय पाईप कालवा व उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव व सिन्नर (नाशिक) या तालुक्यातील 182 गावांमधील 67 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निळवंडे धरण साईट येथे कोनशिलेचे अनावरण करून जलपूजन करण्यात आले. त्यानंतर डाव्या कालवा मार्गिकेचे कळ दाबून पाणी सोडण्यात आले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा विभागाचे दीपक कपूर आदी उपस्थित होते.