अॅण्डरसनने ग्लेन मॅग्राला मागे टाकले, 30व्यांदा घेतले डावात 5 बळी

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स ऍण्डरसन याने शनिवारी ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅग्राच्या कसोटीच्या एका डावात 29 वेळा 5 किंवा त्यापेक्षा जास्त बळी मिळवणाऱया संख्येला मागे टाकले.

जेम्स ऍण्डरसनने येथे सुरू असलेल्या दुसऱया कसोटीच्या दुसऱया दिवशी श्रीलंकेचे 6 बळी 40 धावांमध्ये गारद करीत एका डावात 30 व्यांदा 5 किंवा त्यापेक्षा जास्त बळी गारद करण्याची करामत करून दाखवली. श्रीलंकेने पहिल्या डावात 381 धावा तडकावल्या. इंग्लंडने दुसऱया दिवसअखेरीस 2 बाद 98 धावा केल्या असून आता त्यांचा संघ 283 धावांनी पिछाडीवर आहे.

एका डावात सर्वाधिक पाच किंवा त्यापेक्षा जास्त बळी गारद करणारे

मुरलीधरन – 67 वेळा

वॉर्न – 37 वेळा
हॅडली – 36 वेळा
कुंबळे – 35 वेळा
हेराथ – 34 वेळा
ऍण्डरसन – 30 वेळा

आपली प्रतिक्रिया द्या