जामखेडमध्ये शेतकऱ्याची एक लाखाची तूर चोरली

शेतात काढणीला आलेले एक लाख रुपयांचे तुरीचे पीक कापून नेल्याची घटना जामखेड तालुक्यातील मतेवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

जामखेड तालुक्यातील मतेवाडी येथील शेतकरी महादेव नामदेव रसाळ यांच्या शेतात तुरीचे पीक होते. सध्या त्यांचे हे तुरीचे पीक काढणीला आले होते. दरम्यान, धोंडिबा दामू शेळके, भारत देवीदास मते, सुग्रीव भारत मते, अतुल भारत मते, बबन बाबा पागिरे, दशरथ गंगाराम डुचे, सोमनाथ देवराम पागिरे या सात जणांनी रसाळ यांची 1 लाख रुपयांचे तूर पीक कापून चोरून नेले आहे. यावेळी आरोपींनी फिर्यादी रसाळ यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकीदेखील दिली आहे. याबाबत महादेव रसाळ यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलिसात सातजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या