कश्मीरातील नेते दीड वर्षांसाठी सरकारी पाहुणे

309

जम्मू-कश्मीरमध्ये केंद्राकडून स्थानिक नेत्यांना दीड वर्षापेक्षा जास्त काळ नजरकैदेत ठेवले जाऊ शकत नाही हे खरे, पण या नेत्यांना अटक झालेली नाही, ते तर सरकारी पाहुणे आहेत, असे केंद्रीय मंत्री जीतेंद्र सिंह यांनी आज येथे सांगितले. नेत्यांच्या स्थानबद्धतेला दोन महिने होऊनही त्यांना मुक्त करण्यात आले नसल्याबद्दल त्यांनी अशी खोचक प्रतिक्रिया दिली.

जम्मू-कश्मीरला स्वायत्तता देणारे 370 कलम केंद्र सरकारने हटवल्यानंतर खोऱ्यात शांतता आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांच्यासहित तेथील काही स्थानिक नेते स्थानबद्ध आहेत. याबाबत बोलताना जीतेंद्र सिंह पुढे म्हणाले की, खोऱयातील परिस्थिती आता सामान्य आहे. येथील संचारबंदीही उठवण्यात आली आहे. या नेत्यांना व्हीआयपी बंगल्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्या करमणुकीसाठी त्यांना हॉलीवूड चित्रपटांच्या सीडीज देण्यात आल्या आहेत. त्यांच्यासाठी जिमचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या