कश्मीरमध्ये 24 तासांत 4 चकमक, 5 दहशतवादी ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
amry-jawan

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू-कश्मीरमध्ये गेल्या 24 तासांत दहशतवाद्यांविरोधात चार चकमक उडाल्या. तर शोपियानमधील इमाम साहेबमध्ये नुकतीच चकमक सुरू झाली आहे. दोन-तीन दहशतवादी इथे लपल्याची शक्यात आहे. तर बंदीपोरात झालेल्या चकमकीत लश्कर-ए-तोयबाचे 2 दहशतवादी मारले गेले. लश्कर-ए-तोयबाचा प्रमुख कमांडर अली भाईचा देखील खात्मा करण्यात यश आसे आहे.

गुरवारी रात्री बारमुला जिल्ह्यात चकमक उडाली. यामध्ये दोन जण मारले गेले. शोपियानमध्ये देखील एका दहशतवाद्याला ठार करण्यात हिंदुस्थानला यश आले आहे. मात्र याच चकमकीवेळी एक अधिकाऱ्यासह तीन जण जखमी झाले.

अली भाई हा मुळचा पाकिस्तानचा असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. श्रीनगरमधील संरक्षण विभागाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले की, कलंतरा मधील नमबलनारमध्ये दोन दहशतवादी ठार करण्यात आले. याठिकाणी चकमक संपलेली नाही. तसेच चकमकीत एक अधिकारी आणि दोन जवान जखमी झाले. जखमींवर बादामीबाग येथे सैन्याच्या 92 बेस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तसेच आजूबाजूच्या परिसरात देखील शोधमोहमी सुरू आहे.