
जम्मू-कश्मीरमधील राजौरी परिसरात मंगळवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी सर्च ऑपरेशनदरम्यान पोलिसांवर गोळीबार केला. यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. कोटरंका पोलीस स्टेशन परिसरातील मंदिर गालाच्या वरच्या ढेरी खाटुनी परिसरात सायंकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी दहशतवाद्यांनी 10 ते 15 राऊंड फायरिंग केले. सुरक्षा दलाने परिसराला घेराव घातला आहे.
जम्मू-कश्मीर पोलिसांच्या विशेष ऑपरेशन्स ग्रुपची टीम परिसरात सर्च ऑपरेशन राबवत असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यानंतर अतिरिक्त सुरक्षा दल घटनास्थळी तैनात करण्यात आले. परिसरात चार दहशतवादी लपल्याचा अंदाज असून सुरक्षा दलाने परिसराला घेराव घातला आहे. लष्कराच्या ड्रोन आणि थर्मल इमेजिंग उपकरणांच्या मदतीने दहशतवाद्यांचे नेमके ठिकाण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.