कश्मीरात पुन्हा हिंदूंचे टार्गेट किलिंग सुरू, एकाच गावावर दहशतवाद्यांचा दुसऱयांदा हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
terrorist

कश्मीरमध्ये पुन्हा हिंदूंचे टार्गेट किलिंग सुरू झाले असून राजौरीतील धांगरी गावात रविवारी केलेल्या अंधाधुंद गोळीबारात 4 हिंदूंना ठार मारल्यानंतर आज पहाटे पुन्हा दहशतवाद्यांनी गावात आयईडी स्फोट घडवून आणला. त्यात दोन मुलींचा जागीच मृत्यू झाला. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अशा प्रकारे हिंदूंचे हत्याकांड घडवून दहशतवाद्यांनी रक्तरंजित सुरुवात केली आहे.

कश्मीरमध्ये 370 कलम रद्द केल्यानंतर दहशतवादी कारवाया थांबतील, अशी आशा व्यक्त करण्यात येत असताना हिंदूंचे टार्गेट किलिंग पुन्हा सुरू झाले आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये कश्मिरी पंडितांचे टार्गेट किलिंग सुरू झाले होते. त्यामुळे कश्मीर खोऱयातील अनेक पंडित पुन्हा कुटुंबीयांसह जम्मूत परतले होते. मात्र, हे सत्र थांबले आहे असे वाटत असताना 2023 या नवीन वर्षांच्या सुरुवातीपासून हिंदूंना आणि पंडितांना दहशतवाद्यांनी पुन्हा टार्गेट केले आहे.

घटनाक्रम
रविवारी रात्री उशिरा राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्याच 4 जण ठार तर 5 जण जखमी झाले.
रविवारी संध्याकाळी श्रीनगरच्या हवाल चौकात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या 28 व्या बटालियनच्या बंकरवर ग्रेनेड हल्ला केला. यात एकही जवान जखमी झाला नाही. मात्र, यात एक रहिवासी जखमी झाला.
रविवारी दुपारी पुलवामाच्या राजपोरा भागात सीआरपीएफ जवानाकडून तरुणाने एके-47 हिसकावून घेतली. मात्र, त्याच्या कुटुंबीयांना त्याला समजावत सैन्याला रायफल परत केली.

2022 मध्ये 93 चकमकी, 29 नागरिकांची हत्या
कश्मीरमध्ये 2022 मध्ये दहशतवाद्यांसोबत सुरक्षा दलाच्या 93 चकमक झाल्या. या चकमकींमध्ये 172 दहशतवादी मारले गेले. त्यापैकी 42 परदेशी होते. त्याचवेळी दहशतवाद्यांनी या वर्षी 29 नागरिकांची हत्या केली, त्यापैकी 3 कश्मिरी पंडितांसह 6 हिंदू होते. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये सर्वाधिक 108 दहशतवादी हे लष्कर-ए-तोयबा आणि त्याच्याशी संबंधित संघटना ‘द रेझिस्टन्स फ्रंट’चे दहशतवादी

आधारकार्ड बघून घातल्या गोळय़ा
राजौरी जिह्यातील धांगरी गावात रविवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी लोकांना घराबाहेर बोलावले. त्यांचे आधारकार्ड चेक केले आणि त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार सुरू केला. यात गावातील चौघे हिंदू ठार तर 9 जण जखमी झाले. या हल्ल्यात सतीश कुमार (45), प्रीतम लाल (56), शिवपाल (32) यांचा मृत्यू झाला तर चौथ्याचा मृत्यू रुग्णालयात झाला. दरम्यान, या प्रकरणी दहशतवाद्यांविरोधात शोधमोहीम सुरू असतानाच पहाटे पुन्हा दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला.