जम्मू-कश्मीरच्या कुलगाममध्ये चकमक, एका दहशतवाद्याचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मीरच्या कुलगाम भागात रविवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सैन्याला यश आलं आहे.

अजूनही या भागात शोधमोहीम सुरू आहे. सुरक्षा दलांना इथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या परिसराला वेढा घातला. दहशतवाद्यांचा शोध घेतानाच चकमकीला तोंड फुटलं. यात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला.

अद्यापही या परिसरात दहशतवादी लपून बसले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षा दलांनी इथे शोधमोहीम सुरू ठेवली असून परिसराभोवतीचा वेढाही आवळला आहे.

मारल्या गेलेल्या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नसल्याने तोही शोध सुरू आहे. या आधी शनिवारी देखील अशाच प्रकारे बांदीपोरा जिल्ह्यात चकमक झाली होती. त्यात दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं तर सैन्याचा एक जवान जखमी झाला होता.