Jammu Kashmir – पूंछमध्ये संशयास्पद हालचाली, सुरक्षा दलांकडून दहशवादविरोधी मोहीम सुरू

जम्मू-कश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या संशयित हालचालींची माहिती मिळाल्याने सुरक्षा दलाने रविवारी शोध मोहीम सुरू केली. सुरनकोट, मेंढर, गुरसाई, पूंछ आणि मंडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील वेगवेगळ्या भागात स्थानिक पोलीस, सीआरपीएफ आणि राष्ट्रीय रायफल्सच्या विशेष ऑपरेशन ग्रुप (एसओजी) द्वारे संयुक्त शोध मोहीम सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सुरनकोटमधील गिरजन गली तान, गोदरियानाद, कारू, अप्पर बनीखेत, नदीयान ढोक, मुर्राह आणि नादिली सुम तसेच मेंढरमधील बुरी मोहल्ला, जोगी मोहल्ला, जट्टन मोहल्ला छज्जला, बानोला वन बालाकोट आणि पूंछमधील शाहपूर आणि गुंट्रियन येथे सुरक्षा दलांनी घेराव घालत शोध मोहीम सुरू केली.

गुरसाईमधील लोहारिका, सांगिओट आणि गुरसाई मोरहा आणि मंडीमधील लोअर सावजियान आणि त्याच्या लगतच्या भागातही शोध मोहीम राबविण्यात येत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.