आभार मानणार… मनं जिंकणार! उद्यापासून जळगावातून आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारांनी शिवसेनेला मतदान केले त्यांचे आभार मानण्यासाठी तसेच ज्यांनी शिवसेनेला मतदान केले नाही त्या मतदारांची मने जिंकण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी शिवसेना नेते,  युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला उद्या गुरुवारपासून जळगावातून मोठय़ा धडाक्यात सुरुवात होणार आहे. ‘आदित्य संवाद’च्या माध्यमातून आदित्य ठाकरे युवा पिढीशी तसेच समाजातील प्रत्येक घटकाशी संवाद साधणार असून अवघा महाराष्ट्र ते पिंजून काढणार आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे ही जनआशीर्वाद यात्रा काढणार आहेत. 22 जुलैपर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे. याबाबतची माहिती युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी सोमवारी शिवसेना भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

यात्रेच्या काळात आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे नेते, उपनेते, आमदार, खासदार, युवासेनेचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्र पिंजून काढतील. या यात्रेचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर लगेचच दुसऱ्या टप्प्याचे नियोजन जाहीर करण्यात येईल.