
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने नाशिक येथील महाकवी कालिदास कलामंदिरात कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या स्मृतिदिनी शुक्रवारी मराठी साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा जनस्थान पुरस्कार प्रसिद्ध लेखिका आशा बगे यांना प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार, उपाध्यक्ष संजय पाटील, कार्यवाह मकरंद हिंगणे, अजय निकम, अरविंद ओढेकर, प्रकाश होळकर, सिसिलीया कार्व्हालो, लोकेश शेवडे, विलास लोणारी, गुरुमितसिंग बग्गा, राजेंद्र डोखळे उपस्थित होते.

























































