सिंधुदुर्गात शुकशुकाट, फक्त पक्षांचा किलबिलाट

833

ना माणसांचा कोलाहल.. ना गाड्यांचा कर्कश हॉर्न… ऐकू येत होत ते फ़क्त पक्षांचा किलबिलाट त्याचे कारण म्हणजे जनता कर्फ्यू…! आजच्या जनता कर्फ्यू मध्ये जिल्हावासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत 100 टक्के सहभागी झाल्याने जिल्ह्यात जनता कर्फ्यू यशस्वी झाला आहे. या कर्फ्यूमुळे नेहमी गजबजणाऱ्या बाजार पेठा, बस स्थानक आणि महामार्ग सुनेसुने पडल्याचे दिसून येत होते. जिल्ह्याच्या मुख्यालयात व्यापारी आणि नागरिकांनी 100 टक्के बंद पाळत जनता कर्फ्यू यशस्वी करण्यास आपले योगदान दिले आहे.

कोरोना व्हायरस देशात झपाट्याने पसरत असून या व्हायरसला आळा घालण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत जनता कर्फ्यू चे आवाहन केले होते. तसेच अत्यावश्यक सेवा वगळून देशातील सर्व जनतेने या जनता कर्फ्यू मध्ये सहभागी व्हावे आणि कोरोना व्हायरस ला आळा घालण्यासाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन केले होते. त्यानुसार राज्य शासन आणि सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने जनता कर्फ्यू मध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभागी होण्याचे आवाहन केले होते. तसेच या कर्फ्यू दरम्यान आवश्यक ती खबरदारी घेतली होती. नागरिक विनाकरण महामार्ग आणि ठिकाणी फिरू नयेत यासाठी ठीक ठिकाणी सकाळ च्या सत्रात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र जिल्हावासियांनी या कर्फ्यू ला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सर्व नागरिक आपल्या घरातच थांबले होते. त्यामुळे एरवी जिल्ह्यात सर्वत्र ऐकू एणारा माणसांचा कोलाहल आणि गाड्यांचा कर्कश हॉर्न आज थांबला होता. तर सगळीकडे पक्षांचा मधुर किलबिलाट ऐकू येत होता.

राष्ट्रीय महामार्ग सुमसाम

नेहमीच लाखो वाहनाच्या वाहतूकीमुळे आणि वाहनांच्या आवाजामुळे गजबजनारा मुंबई गोवा महामार्ग आज मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित जनता कर्फ्यू मुळे सुमसाम दिसत होता. एकही वाहन या महामार्गावर फिरत नव्हते.

आपली प्रतिक्रिया द्या